गोपाळ भाऊ मोरे युवा मंच व स्वरूप सिंधू महिला बचत गट यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिननिमीत्त पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरण प्रेमी मा.राजाभाऊ सावळे यांचा सन्मान गोपाळ भाऊ मोरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी,स्मुर्तीचिन्ह तसेच शाल,श्रीफळ,देऊन गौरविन्यात आले.
या सत्कार करण्याचे कारण मागील १५ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात मा.राजू सावळे यांचे पर्यावरणचे काम पाहत आलो आहोत. जलपर्णीचा वाढता प्रभाव व याचा समतोल राखण्यासाठी पाठपुरावा नेहमीच पवना, इंद्रायणी व मुळा नदीचे,ड्रेनेज नदीत मिसळल्याने प्रदुषण तसेच मैलाशुध्दीकरण प्रकल्प वेळेत न केल्याने राजू सावळे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करून पिं.चि.आयुक्तांची सात लाखाची बॅंक गॅरटी जप्त करून घेतली व कारवाई करण्यात आली.कंपन्यांचे केमिकल मिसळून प्रदूषण होते यासाठी एम.आय.डि.सी मधिल १०८ कंपन्या बंद करून घेतल्या पर्यावरण संदर्भात नेहमी राजू सावळे यांनी महापालिका प्रशासन कडुन चांगले काम करून घेतले आहे.
” हि पर्यावरण सृष्टी आपल्याला अमूल्य ऑक्सिजन फुकट देते पण आपल्या मानवी कृत्यामुळे ह्या निसर्ग सृष्टीला खुप हानी पोहचली आहे, म्हणूनच कोरोना महामारीच्या काळात आपल्याला प्राणवायू विकत घ्यावा लागला”
यासाठी येणाऱ्या काळात आपली नैतिक जबाबदारी समजून प्रत्येक व्यक्ती ने एक झाडं लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केला पाहिजे “झाडे लावा झाडे जगवा”
असे राजू सावळे यांनी मनोगत व्यक्त केले.
ह्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर बचतगट महिला महासंघ अध्यक्ष जन्नत सय्यद ,प्रभाग अध्यक्ष फैमीदा शेख,जयश्री वायकर, छाया मते, वंदना मते,अमृता घाडगे,साहारा शेख ह्या उपस्थित होत्या.
पर्यावरण प्रेमी व मनसेचे पदाधिकारी निलेश नन्नवरे, भरत क्षेत्रे, अनिकेत कांबळे, साईराज भोसले,मंगेश भालेकर आदी उपस्थित होते.
सर्व उपस्थित पाहुण्याना,पदाधिकारी,महिलांना यावेळी मा.राजू सावळे यांनी प्रत्येकाला एक झाडे वाटप केले व सर्वाना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.