तांदळी गावात एक कोरोना बांधीत रुग्ण नाही
नगर प्रतिनिधी ( शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील तांदळी (वडगाव) गाव हे आज सध्याला कोरोना मुक्त झाले आहे. गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण आनंदा बरोबर या गावातील कोरोना महामारी काळात उपचार दरम्यान घरातील कर्ता पुरुष हिरावल्याने दुःख हि आहे. यांत गावातील मृत्यू संख्या १२ आहे. आज पर्यंत कोरोना वर यशस्वी मात करून ८५ रुग्ण घरी आलेले आहे. गावातील सुयोग्य नियोजन केल्याने गावातील कोरोना संख्या आटोक्यात राहिली. यासाठी गावात कडक नियमांची अंमलबजावणी केली.या साठी काही नागरीकांच्या ऱोषाला सामोरे जावे लागले.यात गाव लाॅकडाऊन लावणे गावातील नागरिकांत जनजागृती असेल गावात रॅपिड ॲटीजेन टेस्ट कॅम्पचे नियोजन असेल किंवा गावात औषध फवारणी असेल गावात जनता कर्फ्यु.लसिकरण,रुईछत्तीसी वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात अशा सेविका, अंगणवाडी सेविका , घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्ती तपासणी असेल.त्यात शरीराचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल, तपासणी करणे आशा विविध उपाययोजना करुन गाव कोरोना मुक्त साठी विशेष प्रयत्न करणारे बाजार समितीचे सभापती अभिलाष घिंगे,तांदळी गावचे सरपंच बाळासाहेब ठोंबरे, उपसरपंच वैभव मुनफन, ग्रामसेवक शरद पिंपळे, कामगार तलाठी विजय बेरड, ग्रामपंचायत सदस्य दिपक घिंगे, ग्रा.सदस्य पोकळे सोमनाथ, सामाजिक कार्यकर्ते,आकाश ठोंबरे, तुषार आधाळे, संजय पवार, आशा सेविका आशा आंधळे,ग्रा.सदस्य रमेश ठोंबरे,राजु उबाळे, संतोष घिंगे, ग्रामपंचायत कर्मचारी मनुफन, गावातील सुज्ञ नागरिकांना तांदळी गाव कोरोना मुक्ती साठी विशेष प्रयत्न केले त्यामुळे आज गाव कोरोनामुक्त झाले आहे.