शबनम न्यूज / पिंपरी
पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ओ बी सी महिला शहराध्यक्ष पदी सौ.सारिकाताई पवार यांची निवड करण्यात आली . त्या तसे निवडी चे पत्र देण्यात आले.
सारिकाताई पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील , जेष्ठ नेते व माजी मंत्री .एकनाथराव खडसे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता.शहरात प्रत्येक बूथ वर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले
Advertisement
सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष संजोग वाघिरे , संजय वाबळे (नगरसेवक) , प्रसिध्द गायक आनंद शिंदे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक योगेश मोरे ,.हरिप्रसाद वाबळे , प्रशांत बडगुजर , दीपक चव्हाण, महेंद्र पवार, अनिकेत उबाळे उपस्थित होते.