शबनम न्यूज / पिंपरी
GIS पद्धतीने वृक्षगणना कामासाठी मे.टेरेकॉन इकोटेक प्रा.लि .या ठेकेदारास मुदतवाढ देऊनही अद्यापही वृक्षगणनेचा अहवाल सादर न केल्यामुळे या ठेकेदाराकडून कामकाज काढून घेण्याबाबत रयत विद्यार्थी परिषद वतीने मनपा आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आले आहे या तक्रार अर्जात नामूदकेले आहे कि पिंपरी चिंचवड मनपा अधिकारातील सर्व जमिनीवरील (खाजगी व मनपा) वृक्षगणना भौगोलिक सूचना प्रणालीचा वापर करून 2 वर्ष कालावधीत पूर्ण करून 3 वर्ष कालावधीसाठी देखभाल करण्याबाबत मा. स्थायी समिती सभा ठराव क्र. 1259 दि.08/11/2017 रोजी मान्यतेने वृक्षगणना कामे में. टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. या संस्थेस वृक्षगणना कामी ठेका देण्यात आला.त्यानुसार आदेश क्र.उद्यान/4/काविळ/24/2018 दि11/1/2018 अन्वये देण्यात आले सदर कामकाजाची मुदत 11/01/2018 पासून ते 10/01/2020 पर्यंत वृक्षगणना करणे व त्यानंतर 3 वर्ष देखभाल करणे असे एकूण 5 वर्षांचा कालावधी देण्यात आला होता परंतु वृक्षगणनेच्या कामकाजास विलंब झाल्याने दंडात्मक कारवाई करून में.टेरेकॉन इकोटेक प्रा.लि. यांना प्रतिदिन 1000 ₹ प्रमाणे 234 दिवसांकरिता 2 लाख 34 हजार इतका दंड आकारण्यात आला आहे तरीसुद्धा में. टेरेकॉन इकोटेक .प्रा. लि. यांनी वृक्ष गणनेचे कामकाज पूर्ण केले नाही.
संदर्भ क्र.1 नुसार आम्ही दि.06/05/2021 रोजी संबंधित ठेकेदारास कोणतीही मुदतवाढ देऊ नये व ठेकेदाराकडून कामकाज काढून घेऊन नविन ठेकेदार नियुक्त करण्यासंदर्भात तक्रार केली होती परंतु आम्ही दिलेल्या तक्रारीनंतर संदर्भ क्र 2 नुसार 10/05/2021रोजी मे.टेरेकॉन इकोटेक प्रा.लि.ला मुदतवाढ देण्यात आली.ही मुदतवाढ देत असताना उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दि.12/04/2021 रोजी वृक्षगणनेच्या कामकाजात झालेल्या विलंबाबाबत रक्कम 02 लाख 73 हजार रुपये इतकी दंडाची रक्कम पुढील देय बिलामधून वसूल करण्याचे आदेश दिले.31/05/2021पर्यंत मुदतवाढ देऊन वृक्षगणने संबंधित कामकाज पुर्ण करण्याचे आदेश दिले परंतु आज दि.03/06/2021 पर्यंत सुद्धा वृक्षगणनेचे कामकाज पुर्ण न झाल्यामुळे मे.टेरेकॉन इकोटेक प्रा.लि या ठेकेदाराने अजून वृक्षगणनेचा अहवाल सादर केला नाही.
यावरून असे दिसते की ठेकेदार पालिकेचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालविण्याचे काम करत आहे .वारंवार मुदतवाढ देऊनसुद्धा कामकाज पुर्ण का होत नाही.वारंवार दंड आकारूनही ठेकेदार आपल्याच धुंदीत असल्याचे जाणवते.तरी आम्ही रयत विद्यार्थी परिषद आपणाकडे या पत्राद्वारे मागणी करत आहोत की GIS पद्धतीने वृक्षगणनेचे कामकाज मे.टेरेकॉन इकोटेक प्रा.लि या ठेकेदाराकडून काढून घेऊन त्यासाठी तात्काळ नविन ठेकेदाराची नेमणूक करून वृक्षगणनेचे कामकाज करून घ्यावे.
यामध्ये पालिका अधिकाऱ्यांचे आर्थिक हित जोपासले जात असल्यामुळे या ठेकेदारास अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून वृक्षगणना कामकाज काढून घेण्यात यावे व यासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून वृक्षगणनेचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात यावे. वृक्षांची देखभाल-दुरुस्ती करून पर्यावरणाचा समतोल ठेवण्याचे काम पिंपरी-चिंचवड मनपाकडून करण्यात यावे . या ठेकेदाराकडून 2 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे अन्यथा कोविडच्या परिस्थितीत सुद्धा रयत विद्यार्थी परिषदेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. याची दप्तरी नोंद असावी .असे रयत विद्यार्थी परिषद वतीने सांगण्यात आले आहे.