शबनम न्यूज / पिंपरी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर व पार्थ पवार फांउडेशनच्या वतीने दापोडी येथे कोरोनाच्या काळात देशातील ऑक्सिजनचा होणारा तुटवडा पाहता नागरिकांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्ष रोपटे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक राजू बनसोडे यांच्या वतीने करण्यात आले
या प्रसंगी वृक्ष रोपटे वाटप करताना आम्ही स्वच्छतेची खबरदारी घेतो ,तुम्ही एक झाड लावून ऑक्सिजन वाढविण्याची जबाबदारी घ्या असे अवाहन नगर सेवक राजू बनसोडे यांनी केले
या प्रसंगी मुख्य आयोजक नगरसेवक राजू बनसोडे, स्विकृत नगरसदस्य संजय कणसे,अजय जाधव, आरोग्य अधिकारी सुनिल चव्हाण,पाणीपुरवठा कर्मचारी श्री.दारवटकर,उद्यान अधिकारी पटेल साहेब,आनंद कांबळे आरोग्य कर्मचारी संदिप राठोड, रवि शिंदे,दत्ता कांबळे, सुनिंदर पवार,राजू वालिक,यादव वाघमारे,जाफर, शेख,नरेश सुतार उपस्थित होते