शबनम न्यूज / पिंपरी
देशात वृक्षांच्या नावाने लौकिक असलेले पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे . शहराच्या नावाप्रमाणेच पिंपळ- चिंच- आणि वड या देशी वृक्षांची पाच हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प आज शनिवारी ५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संकल्प लोकप्रिय आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांनी राजमाता जिजाऊ गार्डन येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम प्रसंगी केला.
शहरातील वृक्षांची संख्या वाढवावी व माझे पिंपरी-चिंचवड, हिरवेगार पिंपरी चिंचवड, प्रदूषण मुक्त पिंपरी-चिंचवड करण्याकरिता पर्यावरण प्रेमी , वृक्षप्रेमी, लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने एकत्रित येऊन सहकार्याने कार्य केल्यास शहर सुंदर व हिरवेगार ठेवता येईल असे मत आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांनी मांडले.
सदर वृक्षारोपण प्रसंगी नगरसेवक श्री. शशिकांत आप्पा कदम, नगरसेवक श्री. सागर आंगोळकर, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री. संतोष ढोरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे श्री. संजय मराठे, प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री. नवीन लायगुडे, श्रीगणेश सहकारी बँकेचे संचालक श्री.मारुती तरटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त व उद्यान विभागाचे प्रमुख श्री. सुभाष इंगळे ,उद्यान विभागाचे अधिकारी श्री.गोसावी, स्थापत्य विभागाचे उपअभियंता श्री.चंद्रकांत मोरे, श्री. राहुल पाटील व शिर्के आणि कंपनीचे श्री. विजय बांदल व शहरातील पर्यावरण व वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.