शबनम न्यूज / पिंपरी
दरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धना विषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्या मागचा हेतू आहे.
*माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे* यांच्या हस्ते प्रभाग 28 पिंपळे सौदागर येथील शिवसाई रस्ता येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ते म्हणाले, “कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले.आपणा सर्वांना माहीत आहे ऑक्सिजन झाडापासून मिळतो त्यामुळे सर्वांनी झाडे लावून त्याचे जतन केले तर मानवाचे भविष्य अबाधित राहील. तसेच शहरामध्ये वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर उपाय पाहिजे असेल तर पर्यावरणाचे रक्षण आपणा सर्वांना करावे लागेल.” यावेळी शिवसाई रोडवरील सोसायटीचे चेअरमन सेक्रटरी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.