पुणे प्रतिनिधी ( ४ जून )-अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी. खासदार सुप्रिया सुळे यांची भेट मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये घेतली
मेघराज राजे भोसले व सुप्रिया सुळे यांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. सुप्रिया सुळे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाविषयी सखोल माहिती घेतली व मराठी चित्रपट व्यावसायिकांना मदत तसेच सहकार्य करण्याचा शब्द दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट निश्चितच महत्त्वाची सिद्ध होईल व त्याचा फायदा चित्रपट क्षेत्रातील सर्वानाच होईल अशी इच्छा मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली