शबनम न्यूज / पिंपरी
आज जागतिक पर्यावरण दिन या दिनानिमित्त पर्यावरण विषयक अनेक उपक्रम राबविले जातात या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्ती च्या आठवणी जोपासण्यासाठी एक झाड लावावे या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी “एक झाड आठवणींचं” हा सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे की
सगेसोयरे, मित्रपरिवार, कामातील सहकारी असं कोणी न कोणीतरी आपल्याला सोडून कायमचं निघून गेलं आहे, आपल्यापासून खूप दूर… कधीही फिरून माघारी न येण्यासाठी!
ही माणसं आयुष्यात होती म्हणून आपल्या आयुष्याला अर्थ होता. जीवनचक्रानुसार मृत्यू अटळ आहे. वयाचं, आजाराचं निमित्त होतं आणि माणूस निघून जातो; पण आठवणींच्या रूपानं तो उरतोच प्रत्येकात!
गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी चिरंतन राहण्यासाठी स्मारकं बांधली जातात; पण आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ “एक झाड आठवणींचं” लावलं तर निसर्गाचा समतोलही राखला जाईल आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी देखील चिरंतन टवटवीत, जिवंत राहतील… सळसळत्या हिरव्यागार झाडासारख्या..!