शबनम न्युज / पिंपरी
आज जागतिक पर्यावरण दिन या पर्यावरण दिनानिमित्त विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जात असतात. कोरोना महामारी मुळे आज पर्यावरणापासून मिळणाऱ्या ऑक्सीजन ची किंमत माणसाला समजली आहे. त्यामुळे आज या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम होत आहेत.
भोसरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते निलेश बोराटे यांनी या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावा. झाडे जगवा. पर्यावरण वाचवा असे आवाहन करीत वृक्षारोपण केले. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Advertisement