शबनम न्युज / निगडी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील युवानेते आकाश चतुर्वेदी तसेच वि आर देअर सोशल फाउंडेशन आणि शांतिदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत विविध ठिकाणी वृक्ष रोपण करण्यात आले.
छाया हो रही कम, तीर्थ भूमि हो रही गर्म, तीर्थकरो के वंशज, आओ पेड लगाये हम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज पर्यावरण पूरक उपक्रम विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते संस्था तसेच राजकीय नेत्यांकडून घेण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील युवा नेते आकाश चतुर्वेदी तसेच वि आर देअर सोशल फाउंडेशन आणि शांतीदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वि आर देअर सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष वृषाली प्रवीण तसेच शांतीदूत परिवाराचे अध्यक्ष राहुल रांजणे यांच्या सहकाऱ्यांनी संपन्न झाले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेवक मनसेचे शहराध्यक्ष व मनपा गटनेते सचिन चिखले प्रमुख उपस्थित होते.