शबनम न्युज / पिंपरी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांच्या वतीने वुड्सविल्ले फेज 3 गेट समोर 5 जून 2021 शनिवार रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता भाजप नगरसेविका सारिका नितीन बो-हाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
कोवीड परिस्थितीमुळे शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा कार्यक्रम कमी लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी उपस्थितांना आवाहन करीत आपण सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळा .सॅनिटायझर वापरा , मास्क वापरा आणि सामाजिक दुरीकरण पाळा. तसेच पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषण विरहित वातावरण ठेवण्यासाठी वृक्षरोपण अत्यंत आवश्यक आहे. तसेच या कोरोनाच्या महामारी मुळे नैसर्गिक ऑक्सिजन मिळविण्यासाठी झाडे लावणे अत्यंत आवश्यक आहे. झाडे लावा, पर्यावरण वाचवा व ऑक्सिजन मिळवा, असे आवाहन यावेळी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी केले.