शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षण्यासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांचे कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाचे उद्धाटन महापौर महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते जिजामाता रुग्णालय, पिंपरी येथे आज पार पडले.
या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य संदिप वाघेरे, नगरसदस्या निकिता कदम, स्विकृत सदस्य विनोद तापकिर, संदिप गाडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जिजामाता रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, माहिती न जनता संपर्क विभागाचे प्रफूल्ल पुराणिक उपस्थित होते.