शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निगडी प्राधिकरण परिसरात राजेंद्र बाबर मित्र मंडळ व वृक्षप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागाच्या अध्यक्षा शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, वृक्षप्रेमी जयकुमार गुजर, धनंजय कदम, सचिन कांबळी, किशोर जाधव, अतुल भोंडवे, शंकर घोलफ, गुलाब वाल्हेकर आदींनी सहभाग घेतला.
Advertisement
निगडी प्राधिकरण येथील रस्त्यांच्या कडेला फुटपाथवर, तसेच मोकळ्या जागेत या झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षा रोपण केलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी झाडांजवळ राहणाऱ्या रहिवासी व वृक्ष प्रेमींनी घेतली आहे.
Advertisement