शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या शिक्षण समिती सभापती, नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवस निमित्त प्रभाग क्रमांक २३ मध्ये कोरोना निर्बंध सप्ताह हा उपक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत आज प्रभाग मध्ये २००० आरोग्य किट चे वाटप नगरसेविका मनीषा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्या नंतर प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या मध्ये प्रभागात मनीषा पवार व युवानेते प्रमोद पवार यांनी स्वतः झाडू हातात घेऊन आपल्या सहकाऱ्यांसमवेत साफसफाई केली.
या नंतर नगरसेविका मनीषा पवार यांनी आपल्या प्रभागातील २००० नागरिकांना आरोग्य किट चे वाटप केले तसेच या कोरोना सारख्या महामारी ची साखळी तोडण्या साठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरावे , विनाकारण घर बाहेर पडू नये , सामाजिक अंतर राखावे अश्या प्रकारचे आवाहन हि मनीषा पवार यांनी केले.
नगरसेविका मनीषा पवार यांच्या वाढदिवस निमित्त राबविण्यात येत असलेल्या कोरोना निर्बध सप्ताहात या संपूर्ण आठवड्यात विविध उपक्रम राबिविण्यात येणार आहे; यामध्ये दिनांक ०७ जून रोजी ऑनलाइन लसीकरण नोंदणी करण्यात येणार आहे तसेच ०८ जून रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यानंतर ०९ जून रोजी प्रभागात कीटकनाशक औषध फवारणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे १० जून रोजी गरजू नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात येईल तसेच ११ जून रोजी क्वारंटाईन सेंटरला फळे वाटप करण्यात येतील व १२ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर व कोरोना योद्धांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तसेच या आठवडाभर कोरोना , काळी बुरशी यावर मार्गदर्शन व कोरोना समज-गैरसमज या वर तज्ञांकडून माहितीपर कार्यक्रम घेण्यात येतील अशी माहिती युवा नेते प्रमोद पवार यांनी यावेळी दिली