शबनम न्युज / पिंपरी
माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांनी पिंपरी चिंचवड च्या विकासासाठी दिलेले योगदान महत्वपुर्ण असून या नगरीच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य भावी पिढीस सतत प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पिंपरी वाघेरे येथील पुर्णाकृती पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी आमदार विलास लांडे, नगरसदस्य विठ्ठल उर्फ नाना काटे, मयुर कलाटे, प्रविण भालेकर, नगरसदस्या उषा वाघेरे, सुमन पवळे, वैशाली काळभोर, निकिता कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य महंमदभाई पानसरे, प्रभाकर वाघेरे, संतोष कुदळे, अरुण बोराडे, उत्तम हिरवे, विजय लोखंडे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, शांती सेन, जनसंपर्क विभागाचे प्रफूल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या दिवंगत भिकू वाघेरे पाटील हे पिंपरी वाघेरे गावाचे माजी सरपंच होते. तसेच ते एक आदर्श व्यक्तीमत्व होते, असे सांगून त्यांनी पिंपरी च्या विकासामध्ये पिंपरी उड्डाणपुल, पाणीपुरवठा योजना, बसथांबा या सारख्या विकास कामात दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफूल्ल पुराणिक यांनी केले.