शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी पिंपळे गुरव परिसरात प्रभाग क्रमांक 31 मधील नागरिकांसाठी भाजपचे ललित जालिंदर म्हसेकर यांच्या वतीने अल्प दरामध्ये covid-19 टेस्ट करण्यात येणार आहे. ही टेस्ट नागरिकांच्या घरी जाऊन केल्या जाणार आहेत.
हा उपक्रम चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जात आहे. या कोविड-19 टेस्टसाठी संपर्क करण्याचे आवाहन ललित म्हसेकर यांनी केले आहे. या covid-19 टेस्टमध्ये rt-pcr रॅपिड व सर्व ब्लड टेस्ट करण्यात येणार आहे. नागरिकांना आवाहन करतांना सांगण्यात आले आहे की, आपणास कॉईल टेस्ट करायची असेल तर दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावे –
मो.नं. ९८५०३६२२२२
Advertisement