जागतिक पर्यावरण दिन आणि शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून रावेत येथील अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून रावेत प्रधिकरण येथे शिवस्वराज्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
मनसे युवानेते प्रविण माळी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिकांनी ,तरूणांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
आगामी काळात मनसे च्या माध्यमातून प्रभागात अनेक ठिकाणी वृक्षलागवड, झाडांवरील अनधिकृत जाहिरात बाजी, झाडांवरील खिळे काढणे, झाडांना जाळ्या बसविणे अशा अनेक प्रकारच्या पर्यावरण उपयोगी मोहिमांचे आयोजन करण्यात येईल.
Advertisement
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, प्रसाद जोशी, अमेय तरोडे, ओंकार शिंगटे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित होते