पिंपरी पेंढार- शबनम न्यूज
पिंपरी पेंढार येथील सोशल फाउंडेशन च्या वतीने काल पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला व आज पर्यावरणीदिनी 1000 फळ झाडे वृक्षारोपण करण्याचा संकल्प करून झाडे लावून सुरवात केली.
यावेळी येथील फाउंडेशन च्या वतीने सुरू केलेल्या कोविड सेंटर मध्ये जे रुग्ण बरे होऊन घरी जातात त्यांना उद्योजक राजेश भळगट यांच्या तर्फे एक केशर आंब्याचे झाड ऑक्सिजन ची कमतरता भासू लागल्याने उपाय म्हणून झाडे लावा झाडे वाचवा हा संदेश देण्यासाठी एक झाड भेट देण्यात येत आहे आजही उंब्रज येथील एक महिलेला कोरोनामुक्त झालेवर घरी सोडण्यात आले तेव्हा निवृत्त पोलीस अधिकारी रामचंद्र कुटे , तुकाराम कुटे , विमलेश गांधी यांच्या हस्ते आंब्याची हुंडी भेट देण्यात आली.
भव्य वृक्षारोपण उपक्रमास यावेळी सदस्य कल्पेश कुटे यांनी स्वस्त दारात केशर आंब्याच्या हुंड्या उपलब्ध करून दिल्या. सामाजिक कार्यकर्ते सुरेश दुरगुडे यांनी वाढदिवसाच्या निमित्त खर्च टाळून 50 हुंड्या फाउंडेशन कडे सुपूर्द केल्या त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. आज कोविड सेंटर मधून बऱ्या होऊन उंब्रज येथील शिंगोटे ताईंना एक केशर आंब्याची हुंडी राजेश भाळगत यांच्याकडून निवृत्त पोलिस अधिकारी रामचंद्र कुटे व जेष्ठ नागरिक तुकाराम कुटे यांच्या हस्ते भेट दिली.
सदस्य विमलेश गांधी, महेश अण्णा कुटे, राघव पोटे, राजेश ठुबे, सचिन राजाराम जाधव, संतोष दुरगुडे, बबूशेठ कोरडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष कुटे, पत्रकार अशोक डेरे, दत्ता वेठेकर, तुषार बॉऱ्हाडे, केतन खोल्लम , राहुल घुगे, रोहित खर्गे यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले.
वृक्ष जगवण्याची व पाणी घालण्याची जबाबदारी फाउंडेशन सदस्य संतोष दुरगुडे यांनी स्वीकारली.
या उपक्रमासाठी पोलीस पाटील संकेत जोरी, डॉ बॉऱ्हाडे, डॉ मनोज वेठेकर, डॉ पराग पडवळ, फोटोग्राफर संतोष जाधव, राजेश भळगट, कदिर मोमीन, संतोष कुटे, जालिंदर चव्हाण, रोहन कुटे,
ग्रामपंचायत पिंपरी पेंढार व नागरिकांचे सहकार्य लाभले.