शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
नगरसेविका प्रियांका बारसे यांनी २ नोव्हेंबर २०२० रोजी गवळीनगर प्रभागातील ७० गुंठ्याचे आरक्षण क्र.४०० नव्याने महानगरपालिका प्राथमिक शाळा विकसित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडे मागणी केली होती त्यानुसार प्रशासन अधिकारी मनपा शिक्षण विभाग यांनी सात जानेवारी २०२० रोजी गवळीनगर येथे प्राथमिक शाळेची आवश्यकता असून आधुनिक सोयी सुविधायुक्त प्राथमिक इमारत बांधून मिळण्यासाठी स्थापत्य विभागाला शिफारस पत्र दिले होते.
काम सुरू करण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद महानगरपालिकेने केलेली आहे
तथापि मे २०२१ संपून जून २०२१ सुरू झालेला असून प्रियांका बारसे यांना शाळा आरक्षण विकसित करण्यासाठी च्या कामात गती आढळून येत नसल्यामुळे भविष्याचा विचार करून कार्यकारी अभियंते घुबे सर व मुख्य शहर अभियंते राजन पाटील सर मनपा यांची समक्ष भेट घेऊन शाळा आरक्षण विकसित कामाचे आर्किटेक्चर कामाची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे, यासंदर्भात विचारणा केली तसेच या कामाचे भूमिपूजन करून लवकरात लवकर हे आरक्षण विकसित करण्यास सुरुवात करावी अशी मागणी केली आहे.