पिंपरी, 7 जून – खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनतर्फे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या चिंचवड येथील मोरया हॉस्पिटलला पाच पॅरामीटर असलेले मॉनिटर भेट देण्यात आले. पाच पॅरामीटर असलेल्या मॉनिटरद्वारे अतिदक्षता विभागातील रुग्णांचे ईसीजी, आरआर, आयबीपी, सॅच्युरेशन, प्लस तपासण्याची सुविधा होणार आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, सचिव रवी नामदे यांनी हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी भगवान तांबे यांच्याकडे मॉनिटर सुपूर्द केले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष बशीर सुतार, सदस्य मारुती बहिरवाडे, रामभाऊ जमखंडी यावेळी उपस्थित होते.
रवी नामदे म्हणाले, “मोरया हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. हॉस्पिटलला फाऊंडेशनने पाच पॅरामीटर असलेले मॉनिटर भेट दिले. त्याच्या माध्यमातून अतिदक्षता विभागातील रुग्णांचे ईसीजी, आरआर, आयबीपी, सॅच्युरेशन, प्लस तपासण्याची सुविधा होणार आहे. कोरोना काळात फाऊंडेशनतर्फे विविध हॉस्पिटलला वैद्यकीय सामुग्री भेट देण्यात आली आहे. सध्या शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. महापालिका प्रशासन, वैद्यकीय कर्मचारी, विविध सामाजिक संघटना यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय सामुग्री उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानुसार फाऊंडेशनने मदत केली”.