पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ८ मधील नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुर्तफा व रस्ता दुभाजक याठिकाणी वृक्षारोपण करण्याची मागणी नगरसेवक संजय वाबळे यांनी मनपा आयुका राजेश पाटील यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ८ मधील नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुर्तफा व रस्ता दुभाजक या पुढील ठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे.
१) यशवंतनगर चौकापासून मटेरियल गेट ते स्पाईन रोड.
२) टेल्को रोड – इंद्रायणीनगर कॉर्नर ते इंद्रायणीनगर चौक.
३) गवळीमाथा चौक ते स्पाईन रोड.
४) इंद्रायणीनगर चौकापासून – वेलमेड कंपनी एम.आय.डी.सी. S Block ते इलेक्टॉनिक सदन चौक
५) इंद्रायणीनगर तिरुपती चौक ते पुणे-नाशिक महामार्ग
प्रभाग क्र. ८ याठिकाणी मागील वर्षीच २०१९-२०२० मध्येच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपणासाठी खड्डे व माती याची व्यवस्था करून देखील याठिकाणी वृक्षारोपण केले नसल्याने जनतेच्या कररूपी पैशातून यावर केलेला खर्च वाया गेला आहे हि जनतेच्या पैशाची उधळपट्टी असून दिसून याची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मागील २ वर्षापूर्वीच नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यालगत असणाऱ्या दुर्तफा पदपथावर व रस्ता दुभाजकामध्ये अंदाजे ९ कि.मी. दरम्यान वड, पिंपळ, कडुलिंब या देशी प्रजातीचे व भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या अंदाजे ५०० वृक्षांची तातडीने लागवड करण्यात यावे. असे संजय वाबळे यांनी म्हंटले आहे.