शबनम न्युज / पुणे
माहिती-तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगामध्ये राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मेंढपाळ तथा धनगर समाजाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या धनगर माझा या संस्थेचा 6 वा वर्धापन दिन मेंढपाळांच्या वाड्यावर साजरा करण्यात आला.
या निमित्ताने 5 व 6 जून रोजी मावळ तालुक्यात असलेल्या मेंढपाळांच्या वाड्यावर जाउन मेंढपाळ कुटुंबातील परिवारातील सर्वांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. पुण्यश्लोक फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती व धनगर माझा वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी डीवायएसपी अशोक शेजाळ होते तर उद्घाटन मा. तुकाराम काळे, सूर्यकांत गोपने, बाळासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सदुंबरे गावचे सरपंच सौ शेंडेताई, जनहित संघटनेचे अध्यक्ष अपर्णा दराडे, गणेश दराडे, उद्योजक महादु शिंगटे, अविनाश ढगे,चंद्रहास मतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जोपर्यंत या देशातील मेंढपाळ समाज तसेच राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेले अनेक समाज राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत तो पर्यन्त भारत राष्ट्र हे जगातील महासत्ता राष्ट्र होऊ शकणार नाही असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी केले. तसेच मेंढपाळांना पायाभूत सुविधा शासनाने देवून या मेंढपाळ व्यवसायला डिजिटल करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशी ही मागणी केली.
सदर शिबिरामध्ये सदर शिबिरामध्ये डॉ. चंद्रशेखर कोकाटे (जनरल फिजिशियन अँड सर्जन), डॉ सागर शेंडगे (जनरल फिजिशियन अँड सर्जन) डॉ सौरभ सलगर (जनरल फिजिशियन अँड सर्जन), डॉ दिनेश गाडेकर (फिजिशियन & अतिदक्षता तज्ज्ञ), डॉ संजय पोंदे (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ शैलजा चं. कोकाटे (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ श्वेता गाडेकर (स्त्रीरोगतज्ज्ञ) डॉ दादासाहेब पडळकर, (बालरोगतज्ज्ञ), डॉ सत्यवान गडदे (कान, नाक, घसा तज्ज्ञ), आदि तज्ञ डॉक्टर दोन दिवस या शिबिरात सहभागी होऊन मेंढपाळाच्या परिवरातील सर्वांची तपासणी करून औषध वाटप केले
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव राजेंद्र गाडेकर, डों. झुंजारराव बदडे, भुजंगराव दुधाळे, रेश्मा घोडके, रुक्मिणी धर्मे, दीप्ती ताणले, वृशाली मतकर पावसू करे, दौलत शिंगटे, सागर खटके सागर कोळेकर महावीर सरक, ज्ञानदेव काळे, विकास हजारे, अमोल चोपडे, रवी हळ्नोर, रामजी कोलेकर, पांडा (देवा) कोळेकर, नाथा कोळेकर, गणेश पाटोळे, शंकर माने, धनाजी ढेकळे, राजू ढेकळे, प्रमोद गरगडे, किशोर पाटील, दामाजी खांडेकर, लक्ष्मण यमगर संतोष इंगळे अधिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थापक अध्यक्ष धनंजय तानले यांनी केले तर आभार दौलत शिंगाडे यांनी मानले तर सूत्रसंचालन पावसू कर्हे यांनी केले.
भटकंती करणार्या मेंढपाळ परिवातील 200 जणाची केली आरोग्य तपासणी, पुण्यश्लोक फाऊंडेशनचा उपक्रम
गावगाड्या पासून नेहमीच दूर असलेल्या मेंढपाळांच्या परिवारातील जवळपास 200 पेक्षा जास्त लोकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याचा स्तुत्य उपकम पुण्यश्लोक फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व धनगर माझाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोफत तपासणी व औषध वाटप 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोणा या रोगाला घाबरून गेल्या दीड वर्षापासून अनेक प्रकारचे दुखणे अंगावर काढत असल्याचे यावेळी दिसून आले.
5 व 6 जून रोजी मावळ तालुक्यातील सदुंबरे, खालूम्ब्रे, भंडारा डोंगर, नोघोज, म्हळुंगे, नवलाख उंबरे, कासारसाई, चांदखेड, पुसाने, शिवणे आदि गावाच्या शिवारात जाऊन मेंढपाळ परिवातील 200 पेक्षा जास्त जणाची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध देण्यात आले.
सदर शिबिराचे आयोजन धनंजय तानले यांनी केले होते तर डॉ. चंद्रशेखर कोकाटे (जनरल फिजिशियन अँड सर्जन), डॉ सागर शेंडगे (जनरल फिजिशियन अँड सर्जन) डॉ सौरभ सलगर (जनरल फिजिशियन अँड सर्जन), डॉ दिनेश गाडेकर (फिजिशियन & अतिदक्षता तज्ज्ञ), डॉ श्वेता गाडेकर (स्त्रीरोगतज्ज्ञ) डॉ दादासाहेब पडळकर, (बालरोगतज्ज्ञ), डॉ सत्यवान गडदे (कान, नाक, घसा तज्ज्ञ), आदि तज्ञ डॉक्टर दोन दिवस या शिबिरात सहभागी होऊन मेंढपाळाच्या परिवरातील सर्वांची तपासणी करून औषध वाटप केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी राजेंद्र गाडेकर, सागर खटके सागर कोळेकर महावीर सरक, ज्ञानदेव काळे, विकास हजारे, अमोल चोपडे, रामजी कोलेकर, पांडा (देवा) कोळेकर, नाथा कोळेकर, गणेश पाटोळे, धनाजी ढेकळे, प्रमोद गरगडे, दामाजी खांडेकर, लक्ष्मण यमगर, दौलत शिंगटे, पावसू कर्हे यशवंत दडस धनाजी शिंगटे यांनी केले.