शबनम न्युज / पुणे
पुणे विभागातील 15 लाख 3 हजार 749 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 98 हजार 820 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 63 हजार 20 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 32 हजार 51 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.05 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 23 हजार 440 रुग्णांपैकी 9 लाख 88 हजार 299 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 18 हजार 62 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.57 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 74 हजार 590 रुग्णांपैकी 1 लाख 54 हजार 151 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 62 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 54 हजार 769 रुग्णांपैकी 1 लाख 46 हजार 475 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 176 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 118 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 23 हजार 649 रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 578 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 504 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 22 हजार 372 रुग्णांपैकी 1 लाख 4 हजार 246 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 216 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 910 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 109 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 389, सातारा जिल्ह्यात 1 हजार 111, सोलापूर जिल्ह्यात 479, सांगली जिल्ह्यात 600 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 530 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 97 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 350, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 754, सोलापूर जिल्हयामध्ये 770, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 299 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 924 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 28 लाख 49 हजार 646, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 65 हजार 472, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 86 हजार 783, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 21 हजार 295 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 83 हजार 898 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 91 लाख 51 हजार 507 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 15 लाख 98 हजार 820 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.