शबनम न्युज / नाशिक
सावत्र आईने तिच्या अल्पवयीन मुलाचा अमानुषरित्या छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. घरगुती कारणातून रागाच्या भरात सावत्र आईने मुलाच्या गुप्तांगाला रबर बांधून चटके दिले आहे. या घटनेत मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
निळवंडी पाडे गावात (ता. दिंडोरी) सोमवारी ही घटना आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.या प्रकरणी सावत्र आईविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर सावत्र आईच मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला चटके दिल्याचा आरोप तिने फेटाळला आहे.हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झालं त्यातून ही घटना घडल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. महत्वाचे म्हणजे मुलाची सावत्र आई ही त्याची मावशीच आहे. पत्नीच्या पश्चात मुलांचा चांगला सांभाळ व्हावा यासाठी वडिलांनी त्या मुलांच्या मावशीसोबतच लग्न केले आहे. परंतु मावशीनेच मुलावर अमानुष अत्याचार केला. दरम्यान आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.