शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती, विद्यमान नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना निर्बंध सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहाचा आज तिसरा दिवस , या दिवशी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी थेरगाव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला.
या वृक्षारोपण कार्यक्रमात थेरगाव येथील मुख्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. थेरगाव गावठाणातील बापुजी बुवा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच थेरगाव पोलीस चौकी येथेही व अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
सध्या कोरोना महामारी मुळे नैसर्गिक ऑक्सिजन किती महत्त्वाचे आहे हे माणसाला कळाले आहे प्रदूषण विरहित वातावरण आवश्यक असल्याने वृक्षारोपण करणे ही आवश्यक आहे त्यामुळे या कोरोना निर्बंध सप्ताहात हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे युवा नेते प्रमोद पवार यांनी यावेळी सांगितले.
या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका मनीषा पवार, युवा नेते प्रमोद पवार, विनोद पवार व त्यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.