शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
सांगवी :-दिड वर्षांपासून शालेय विद्यार्थी वाहतुक बंद असल्याने रिक्षावाले व स्कुलव्हॅनवाले काका यांची अवस्था अतिशय हालाखीची झाली आहे.सांगवी पिंपळेगुरव परीसरातील या हतबल काकांना मदत करण्यासाठी माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगवी पिंपळेगुरव ब्लॉकचे अध्यक्ष आपला माणूस श्री शिवाजी पाडुळे धावून आले. असे मत सातारा मित्र मंडळ सांगावी चे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले.
शिवाजीराव पाडुळे यांच्या वतीने आपल्या घासातला घास – संपूर्ण किराणा साहीत्य देवून या रिक्षा चालकांना मानसिक आधार दिला. यावेळी शिवाजीराव पाडुळे म्हणाले की या कठीण काळात मी व माझे जिवलग सहकारी आपल्या सुखदुःखात भक्कमपणे तुमच्या सोबत आहोत हा विश्वास दिला. कोणताही मदत लागली तरी मी व सातारा मित्र मंडळ सदैव तुमच्या पाठीशी राहील असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित रिक्षावाले काकांना किराणा किट वाटप करण्यात आले. यावेळी सातारा मित्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष ,मुख्याध्यापक श्री शिवाजीराव माने सर, खजिनदार श्री सोमनाथ कोरे, उपाध्यक्ष संजय ऊर्फ आबा चव्हाण बाळासाहेब धायगुडे अनिल कुदळे व रिक्षावाले काका उपस्थीत होते.रिक्षावाले काकांचा मानसिक भार हलका करून, बळ देण्यासाठी मुख्याध्यापक श्री शिवाजीराव मानेसर आणि शिवाजीभाऊ पाडुळे यांनी काही भावस्पर्शी गीते सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ कोरे यांनी व आभार संजय चव्हाण यांनी केले.