झोपडपट्टी सुरक्षा दलाचा 26 वा वर्धापन दिन साजरा
पुणे प्रतिनिधी : झोपडपट्टीवासीयांच्या असलेल्या मूलभूत सुविधा आणि त्यांच्या असलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी लढाऊ संघटना म्हणून या संघटनेची स्थापना 7 जून 1995 साली करण्यात आली होती. तळागाळातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यांत करण्यात आला.
अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सातत्याने धरणे, आंदोलने, मोर्चे आक्रमक पणे मांडण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी जेवढे संघर्ष झाले ते यशस्वी पार पडले. समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर संघर्ष शिवाय पर्याय नाही असा विचार संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांनी मांडला.
झोपडपट्टी सुरक्षा झाडाचा 26 वा वर्धापन कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सुरक्षित अंतर ठेवून झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह पुणे येथे संपन्न झाला यावेळी तेे बोलत होते. संघटनेच्या नावाने 26 किलोचा केक भगवानराव वैराट यांच्या हस्ते कापण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी चंद्रकांत कांबळे, संतोष बोतालजी, गणेश लांडगे यांनी वैराट यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सुरेखा भालेराव, मोहम्मद शेख, संतोष कदम, प्रदीप पवार, दत्ता डाडर, अर्चना वाघमारे, सुनील भिसे, सूर्यकांत सपकाळ आदी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी संघटनेबद्दल आपली मतं व्यक्त केली.