शबनम न्यूज / मावळ
जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास दत्ता आण्णा पडवळ संस्थापक अध्यक्ष स्वयंभू फाउंडेशन मावळ ,सरपंच सौ रोहिणी राजेश कोकाटे,बुचडे साहेब ( वनाधिकारी) , रवी घोडे (पोलिस पाटील) सर्व ग्रामपंचायत सदस्य सोबतच
मा.सोमनाथ ताकवले, तांबे साहेब व जाधव साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मा.महेश पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रविण वैद्य सर यांनी केले. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव साहेब व मॅजिक बस या सेवाभावी संस्थेचे सोनवणे साहेब यांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवुन दिले व झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला.तसेच श्री. बाळासाहेब घाडगे(एस आर पी अध्यक्ष )यानी पाहुण्यांचे आभार मानले.
उपस्थित ग्रामस्थ श्री गायकवाड सर,श्री. लक्ष्मण केंगले,श्री. एम बी बोराडे,श्री दुंदा वासावे,श्री.बाळू दाते,
माऊली गायकवाड, दत्ता आण्णा पडवळ मित्र परिवार पिंपरी आदी उपस्थित होते.