शबनम न्यूज / प्रतिनिधी
नांदेड : शहरातील एसव्हीएम कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने 7 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातील हसत्या खेळत्या मुलीनं असं अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. संबंधित मुलीने आत्महत्या का केली? याची पुष्टी अद्याप करण्यात आली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
संबंधित आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय मुलीचं नाव देविका नारायण बेहरे असून तिचे वडील एक ऑटोरिक्षा चालक आहेत.
देविकाने 7 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास आत्महत्या केली आहे. घरात कोणी नसताना देविकाने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
मृत देविकाचे वडील नारायण नागोराव बेहरे यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देविकाने आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली? तसेच तिने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे