शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड -गवळीनगर प्रभागातील गुळवे मैदानातील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरक्षारक्षक नेमावे अशी मागणी नगर सेविका प्रियांका बारसे यांनी मनपा आयुक्त यांच्या कडे केले आहे. हुतात्मा चौकातील नागरिकांनी मैदानातील बॅडमिंटन हॉल व मैदानाची एंट्री तुटून पडलेले आहे आणि त्यामुळे तेथे कोणाचीही आव – जाव सुरु आहे अशी तक्रार नगरसेविका बारसे यांचे कडे केली होती.त्यासंबंधी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका बारसे यांनी म्हंटले आहे कि
दिवसा आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेक अनैतिक कामे चाललेली नागरिकांना दिसतात तर कधीकधी दारू पार्टी ही या ठिकाणी चालते असेही निदर्शनास आले आहे.
महिला व मुलींसाठी हे धोक्याचे असून आपण या बाबीकडे गंभीरतेने पहावे व लवकरात लवकर या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा.
तसेच संबंधित विभागाला एंट्री गेट लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सूचना नगरसेविका बारसे यांनी आठ दिवसापुर्वी दिल्या होत्या तथापि अद्याप पर्यंत दुरुस्ती झालेली नाही तरी आपणही स्थापत्य विभाग,ई क्षेत्रीय कार्यालय यांना हे एंट्री गेट लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी नगरसेविका बारसे यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे.