शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पावसाळ्यापुर्वीची नियोजित कामे लवकरात लवकर पुर्ण करावी, असे मागणीचे निवेदन मनसे युवानेते प्रविण माळी यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे कि, प्रभाग क्र १६ , रावेत, शिंदेवस्ती, रावेत प्रधिकरण प्रभागात पावसाळ्यात अनेकदा विधुत यंत्रणा कोलमडणे , नाले तुडुंब भरणे, सांडपाण्याची होणारी गैरसोय,पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे, अशा अनेक प्रकारच्या अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते त्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होते.
नेमेची येतो पावसाळा…! या उक्ती प्रमाणे प्रत्येक पावसाळ्यात यंत्रणा कोलमडायला हवीच का ? असा प्रश्न निर्माण होतो . या स्थितीत सुधाकरण्यासाठी Pre Monsoon maintenance,विद्युत, सांडपाणी , नालेसफाई अशा अनेक कामांची देखभाल होणे आणि प्राधान्यक्रमाणे कामे वेळेत मार्गी लागणे गरजेचे आहे. नागरिकांच्या वरील समस्यांवर शहानिशा करून लवकरात लवकर कामे पुर्ण व्हावीत यासाठी शहर मनसेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक शहराध्यक्ष गटनेते सचिन चिखले , शहरसचिव रूपेशभाऊ पटेकर , उपशहराध्यक्ष राजुभाऊ सावळे , विभाग अध्यक्ष दत्ताभाऊ देवतरासे, वाहतुक सेना अध्यक्ष सुशांतभाऊ साळवी, उपाध्यक्ष नितिनभाऊ सुर्यवंशी ,उपविभाग अध्यक्ष प्रविण माळी आदि उपस्थित होते.