शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेऊन मैदानात उतरली आहे. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन भाजपा युवा मोर्चाने या उपक्रमाला सुरुवात केली व समाजासमोर एक अत्यंत सोपा वृक्षारोपणाचा संकल्प मांडला आहे.
भाजपा शहराध्यक्ष आमदार पै. महेशदादा लांडगे व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाने यासाठी बालकाश्रम येथे फ्रुट पार्टी चे आयोजन केले होते, जेणेकरून तेथील मुलांना फळांची मेजवानी सुद्धा झाली व बियांपासुन रोपटे कसे बनवावे याची माहिती देऊन प्रशिक्षण पण झाले. स्नेहछाया बालक अनाथ आश्रम, दिघी व पुनरुत्थान समरसता गुरुकुल, चिंचवड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांना फळापासून अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण रोपे कसे तयार करू शकतो व का केले पाहिजे याबद्दल माहिती देण्यात आली, तसेच प्रत्येक फळांच्या बीया सांभाळून ठेऊन दरवेळेस त्यातून रोप तयारच करावे व ते रोप जोपासुन वाढवावे हे शिकवण्यात आले. आश्रमातील मुलांनी अगदी उत्साहाने यात सहभाग नोंदवला व दरवर्षी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी योगदान देणार असेही सांगितले.
आज समाजात लोकांना ऑक्सिजनचे व पर्यावरणाचे महत्व कळू लागले आहे पण त्यात त्यांचा सहभाग किती मोलाचा आहे हे पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, आम्ही तर दरवर्षी वृक्षारोपण करतोच पण प्रत्येक नागरिकाने व परिवाराने यात आपला वाटा दिला तर लवकरच आपण निसर्गाची झालेली हानी भरून काढु असं युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे म्हणाले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, पूजाताई आल्हाट, पंकज शर्मा, जयदीप कर्पे, चिटणीस रवी जांभुळकर, प्रकाश चौधरी, सोशियल मीडिया संयोजक विक्रांत गंगावणे, प्रियांका शाह सिंग, अर्पिता कुलकर्णी, दिगंबर गुजर, सुहास आढाव, प्रमोद पठारे, अनिकेत देवरमानी तसेच संजयभाऊ गायकवाड व दत्तात्रय इंगळे सर उपस्थित होते.