शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका शिक्षण समिती सभापती मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 23 मध्ये ‘कोरोना निर्बंध सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा आजचा चौथा दिवस या सप्ताह अंतर्गत संपूर्ण प्रभागात कीटक नाशक औषध फवारणी करण्यात आली.
सध्या कोरोना महामारीमुळे आरोग्य बाबत अनेक जण काळजी घेत असताना आपल्या प्रभागात हि आरोग्या च्या त्रासदायक घटना घडू नये, याकरिता नगरसेविका मनीषा पवार या काळजी घेत आहेत. प्रभागातील नागरिकांना आरोग्याच्या कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रभागात कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली असल्याचे युवा नेते प्रमोद पवार यांनी यावेळी सांगितले.
तसेच नगरसेविका मनिषा पवार या वारंवार आपल्या प्रभागातील नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावे, सामाजिक अंतर ठेवावे, आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, जमेल तेवढे घरातूनच काम करावे, अशा मार्गदर्शक सूचना नागरिकांना देत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपयुक्त उपक्रम प्रभागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.