पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना चे नवीन 314 रुग्णसंख्या ची नोंद झाली आहे त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात आज पर्यंत दोन लाख 52 हजार 978 जण कोरोना बाधित झाले आहे आज दिवसभरात कोरोना मुळे 18 जण मयत झाले असून त्यामध्ये नऊ मनपा हद्दीमधील तर नऊ मनपा हद्दीबाहेरील आहेत आज दिवसभरात ३०० जण पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना मुक्त झाले असून आजपर्यंत 2 लाख 45 हजार 840 जन कोरोना मुक्त झाले आहेत तर शहरात आतापर्यंत कोरोना मुळे 4193 जण मयत झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चे रुग्ण कमी होत असतानाच नियम शिथिल करण्यात आले आहेत नागरिकांनी तरीही शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे वारंवार प्रशासन वतीने आवाहन करण्यात येत आहे.
previous post