शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीन केली आहे त्यानंतर प्राधिकरणाचे सर्व अधिकार पीएमआरडीए आणि महापालिकेकडे आले आहेत या निर्णयाचा शहर भाजप वतीने विरोध करण्यात आला.
पिंपरी चिंचवड भाजप शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला विरोध नोंदविला या विलीनीकरण मुळे शहराचे मोठे नुकसान होणार आहे या निर्णय विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
.यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले की पिंपरी-चिंचवड करांच्या दृष्टीने प्राधिकरण विलीनीकरणाचा चा निर्णय हा हितकारक नाही. प्राधिकरणाचे महापालिकेत विलीनीकरण व्हायला हवे होते आता विकास क्षेत्र महानगरपालिकेकडे दिले आहेत त्या ऐवजी सर्वच क्षेत्र महानगरपालिकेकडे देणे आवश्यक होते भविष्यात याचा पालिकेवर मोठा परिणाम होणार आहे या निर्णयाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असून अधिवेशनातही आपण आवाज उठविणार असल्याचे लक्ष्मण जगताप यांनी सांगितले
भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की प्राधिकरण शहरात चे वैभव असलेली संस्था होती प्राधिकरणाच्या जागा ठेवींचा पीएमआरडी ला वापर व्हावा यासाठीच विलीनीकरण केले प्राधिकरणाचा उद्देश सफल झाला नाही प्राधिकरणाचे स्वतंत्र अस्तित्व राहावे असा आमचा उद्देश आहे या निर्णयाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करू
या पत्रकार परिषदेत महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे व महापालिकेची सत्ता पक्षनेते नामदेव ढाके यांनीही या निर्णयाविरोधात आपला निषेध नोंदविला