शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड – नुकतेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना काळात ज्यांनी आपले माता पिता किंवा पालक गमावले अशा अपत्यांना पी एम केअर्स अंतर्गत मदत देण्याचा एक संवेदनशील निर्णय घेतला.या निर्णया अंतर्गत अनाथ पाल्यांना वयाच्या 18 व्या वर्षापासून मासिक अनुदान.वयाच्या तेविसाव्या वर्षी दहा लाख रुपये तसेच मोफत शिक्षण. उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाचे व्याज पी एम केअर्स मधून .आयुष्यमान भारत अंतर्गत अठराव्या वर्षापर्यंत पाच लाखांचा विमा प्रीमियम पीएम केअर्स मधून भरणार. असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मा.पंतप्रधान यांनी घेतले.
शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी गवळीनगर प्रभागातील अशा अनाथ झालेल्या पाल्यांची माहिती शहराध्यक्ष कार्यालयास देणेबाबत कळवले होते आणि त्याची जाहिरात केल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी आपल्या पाल्याला ही मदत मिळावी आणि त्यांचे आयुष्य सुकर जावे यासाठी नगरसेविका प्रियांका बारसे जनसंपर्क कार्यालयाशी तसेच नगरसेविका प्रियांका बारसे यांच्याशी संपर्क साधून आपल्या घरगुती अडचणी शेअर केल्या व या योजनेबाबत समाधान व आनंद व्यक्त केला.तसेच पाल्यांची माहिती देण्यास सुरुवात केलेली आहे.
आत्तापर्यंत संपर्क साधलेल्या निराधार पाल्याची पहीली यादी शहराध्यक्ष BJP जनसंपर्क कार्यालयाला पाठवली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरसेविका बारसे यांनी आजही सर्व पालकांना तसेच अनाथ झालेल्या पाल्याच्या नातेवाईकांना आवाहन केले आहे की कोरोनामुळे जर कोणाही निधन झाले असेल तर त्यांनी कार्यालयाशी लवकरात लवकर संपर्क साधावा व या योजनेचा लाभ आपल्या पाल्यास मिळवून द्यावा.