गोशाळेला चारा वाटप, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना धान्य वाटप, अश्या अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
गो शाळेला चारा वाटप, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना धान्य वाटप, अश्या अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन
पिंपरी चिंचवड – (चिखली) प्रतिनिधी – दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांच्या सौभाग्यवती सौ मंगल ताई राहुल दादा जाधव यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारच्या गर्दीचा कार्यक्रम आयोजित न करता चिखली रामदास नगर येथील श्री लांडगे महाराज यांच्या गोशाळेतील गो मातांसाठी तसेच पांजरपोळ गोशाळेतील गो मातांसाठी गो चारा वाटप करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना गहू, तांदूळ, डाळ ,साखर, खाद्य तेल वाटप करण्यात आले तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसाठी मोफत सेफ्टी टँक चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी महापौर राहुल जाधव यांनी सांगितले की आयुर्वेदामध्ये गोमातेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे कोरोना च्या काळामध्ये आपण इतर उपाय बरोबरच आयुर्वेदाचा पण आधार घेतला पाहिजे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र गोमाते चे पूजन करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे आजच्या या विज्ञानाच्या या काळामध्ये आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे काम पांजरपोळ गोशाळा असेल किंवा ह.भ.प. लांडगे महाराज असतील यांच्या माध्यमातून शहरीकरण झालेल्या जाधव वाडी, चिखली भागांमध्ये गोमातेची सेवा करण्याचे काम होत आहे. या मंडळींना काही प्रमाणात मदतीचा हातभार लावण्यासाठी सौ मंगल राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण गो चारा दान केला आहे.
समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या कामांमध्ये हातभार लावावा कोरोना च्या या अत्यंत कसोटीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता शहरवासीयांच्या उत्तम आरोग्यासाठी काम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आपल्या परीने शक्य तितकी मदत या भगिनींना करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन केले तसेच राहुल जाधव यांनी सांगितले की जाधव वाडी आणि परिसरातील नागरिकां च्या काही परिसरात अजून ड्रेनेज लाईन नसल्यामुळे सेफ्टी टँक साठी खूप वाट पाहावी लागत होती त्यामुळे आपण ही सेवा मोफत सुरू करत आहोत.
प्रभागातील पंत नगर, सहयोग नगर, वडाचामळा, रिव्हर रेसिडेन्सी, ऐश्वर्यम हमारा ,वडाचा मळा इत्यादी परिसरातील महिला भगिनींनी व नागरिकांनी सौ मंगल ताई जाधव यांचा वाढदिवस कोरोना चे नियम पाळून घरगुती पद्धतीने साजरा केला.