शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय महिला विभाग वतीने गरजू नागरिकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 22वा वर्धापन दिन साजरा होत आहे. सध्या कोरोनाच्या महामारी मुळे अनेक नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशाच गरजू नागरिकांसाठी या निमित्ताने एक मदतीचा हात या दृष्टिकोनातून मोफत धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, सध्या कोरोना स्थिती असल्याने या संकटमय काळात गरजू नागरिकांना मदत करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा गंगा ताई धेंडे यांनी हा एक चांगला उपक्रम या निमित्ताने राबविला आहे. असेच उपक्रम राष्ट्रवादी वतीने नेहमीच राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे खासदार शरद पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक असल्याने असे उपक्रम होणे गरजेचे आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय महिला विभागाच्या अध्यक्षा गंगा ताई धेंडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या प्रगतिक व पुरोगामी विचारांचा वारसा जपत तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करत राज्यातील शेवटच्या घटकासाठी काम करणाऱ्या आपल्या निर्धाराला बळकटी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या वर्धापन दिनी आम्ही गरजू नागरिकांना धान्य वाटप केले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील प्रमुख उपस्थित होते, त्यांच्याच सोबत माजी शिक्षण मंडळ सभापती फजल भाई शेख व गोरक्ष लोखंडे, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष यश साने, ओबीसी सेलचे अध्यक्षा सारिका ताई पवार, बचत गट महासंघ अध्यक्षा कविताताई खराडे यांच्यासोबतच अर्चना ताई पवार, सुरेखा ताई कांबळे, ज्योती गायकवाड, अंजली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.