शबनम न्युज / पुणे
१२ जून हा दिवस जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज इतर सर्व आस्थापनांमध्ये १४ वर्षाखालील मुले कामासाठी ठेवू नये. १४ वर्षाखालील मुले कोणत्याही आस्थापनांमध्ये कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी कोणत्याही आस्थापनेने १४ वर्षांखालील मुले कामावर ठेवू नये असे आवाहन श्री. शैलेंद्र पोळ, अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग पुणे व श्री. अभय प. गिते, कामगार उप आयुक्त (प्र) पुणे जिल्हा पुणे यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement