शबनम न्युज / पुणे
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा, पुणे या महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षणसंस्थेने प्रकाशित केलेल्या निवृत्त सनदी अधिकारी तथा मॅटचे माजी उपाध्यक्ष श्रीधर जोशी यांच्या ‘महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम -1979’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून यशदाचे निबंधक सुमेध गुर्जर, यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बबन जोगदंड, प्रकल्प सहायक संजीवनी रणदिवे उपस्थित होते.
श्रीधर जोशी हे महाराष्ट्रातील शासकीय नोकरदारांना मोफत सहाय्य व सल्ला देऊन शासन सेवेतील अडीअडचणीसंदर्भात सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यांनी मॅटमध्ये उपाध्यक्ष म्हणूनही काही काळ सेवा केली आहे. महाराष्ट्र नागरी शिस्त व अपील नियमांच्या संदर्भात त्यांचा सखोल अभ्यास आहे.
हे पुस्तक मे 2021 पर्यंत अद्ययावत केले असून या पुस्तकात संक्षिप्त टीपा, महत्त्वाची शासकीय परिपत्रके, शासकीयअधिकारी, कर्मचा साठी मार्गदर्शक सूचना याने हे पुस्तक परिपूर्णअसून विभागीय चौकशी, शिस्तभंग विषयक प्रकरणे, अपील, वेतननिश्चिती रजा, किरकोळ कारवाई, लैंगिक छळाच्या तक्रारी, निलंबन या व अन्य महत्त्वपूर्ण प्रकरणांचा या पुस्तकात समावेश केला असल्याने हे पुस्तक कर्मचा-साठी दिशादर्शक आहे.
या पुस्तकाची पृष्ठसंख्या 436 असून 500 रुपये किमतीचे हे पुस्तक सवलतीत 300 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे पुस्तक यशदाच्या माध्यमप्रकाशन केंद्राच्या विक्री दालनातकार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून उपलब्ध होऊ शकेल तसेच हे पुस्तक अॅमेझॉनवरही उपलब्धआहे. या पुस्तकाचा राज्यातील शासकीय नोकरदारांना मोठा उपयोग होईल.