शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती विद्यमान नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 23 मध्ये कोरोना निर्बंध सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहाचा आज पाचवा दिवस मनीषा प्रमोद पवार यांच्या वतीने प्रभाग 23 मधील गरीब कुटुंबातील तसेच गरजू कुटुंबातील नागरिकांना अन्नदान करण्यात आले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते
मागील दीड वर्षापासून सर्वत्र संकटमय काळ सुरू आहे कोरोना सारख्या महामारी मुळे बरेच दिवस नागरिकांना लॉकडाउनच्या परिस्थितीत राहावे लागले अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना यावेळी करावा लागला अशा गरजू लोकांसाठी यानिमित्ताने अन्नदान वाटप करून दिलासा देण्याचा एक छोटासा प्रयत्न केल्याचे यावेळी युवा नेते प्रमोद पवार यांनी सांगितले
प्रभागात मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप करताना नागरिकांनी नगरसेविका मनिषा पवार यांचे आभार व्यक्त केले