पिंपरी । प्रतिनिधी
पुणे- मुंबई महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा असलेल्या भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील वाहतुकीचे नियोजन करा. नागरिकांची गैरसोय होणार नाही. याची काळजी घ्या, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
आमदार लांडगे यांनी महापालिका अधिकारी व पदाधिकारी यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी भक्ती-शक्ती उड्डाणपूल येथे पाहणी दौरा केला. यावेळी क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनूप मोरे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी विजय भोजने आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, भक्ती- शक्ती दोनपदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून सोयीनुसार रस्ता बंद केला जातो. याठिकाणी दिशादर्शक फलकही लावलेले नाही. त्यामुळे निगडी प्राधिकरण आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत माझ्याकडे सोशल मीडिया आणि फोनद्वारे तक्रारी येत आहेत. यासाठी आम्ही तत्काळ पाहणी केली आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील वाहतूक नियोजनबद्ध करा! – भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सूचना
Advertisement