पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याची श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून भारतीय संघात निवड होणारा ऋतुराज गायकवाड हा पहिला खेळाडू ठरला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (क्रिकेट) जुलै महिन्यात होणार्या श्रीलंका दौर्यासाठी संघ जाहीर केला आहे. काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती देण्यात आली आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.