शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती विद्यमान नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना निर्बंध सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहाचा आज सहावा दिवस या सप्ताह अंतर्गत नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वतीने बालेवाडी येथील कोविड सेंटर मधील रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बालेवाडी येथील सर्व रुग्णांना नगरसेविका मनिषा पवार यांनी फळे वाटप केली मागील सहा दिवसा पासून ओरॉन निर्बंध सप्ताह अंतर्गत अनेक उपक्रम घेण्यात आले यामध्ये नागरिकांना आरोग्य किटचे वाटप ,गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य वाटप ,स्वच्छता अभियान राबविण्यात आले ,तसेच प्रभाग क्रमांक 23 मध्ये औषध फवारणी करण्यात आली , तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसी करण्यासाठी नागरिकांची ऑनलाइन नोंदणी असे उपक्रम या सप्ताहांतर्गत राबविण्यात आले.