कष्टकरी जनता आघाडी महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिता सावळे यांची नियुक्ती करण्यात आली कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले, या वेळी , घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे जिल्हाध्यक्ष मल्हारभाऊ काळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळवे, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष जयश्री एडके , मधुरा डांगे, अनिता काजळे आदी यावेळी उपस्थित होते,
बहुजन समाजातील अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्या भीमा कोरेगाव प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या धडाडीच्या नेत्या अनिताताई सावळे यांची कष्टकरी जनता महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .
Covid-19 मुळे कष्टकरी बहुजन ,दलित, मुस्लिम, आदिवासी आदी विविध घटकांचे अतोनात हाल सुरू असून गेल्या चौदा महिन्यापासून त्यांचे रोजगार बंद आहेत अशा परिस्थितीमध्ये या सर्व घटकांना सावरण्यासाठी त्यांना सावरण्यासाठी आणि त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे बहुजन आदिवासी , महिलांचे प्रश्न अधिक बिकट होत आहेत , प्रत्येक पातळीवर महिलांची कुचंबणा आणि शोषण होत असून, महिलांना पुरुषांच्या बरोबरीने कामाचा मोबदला मिळाला पाहिजे , त्यांना कामाच्या ठिकाणी मुक्त संचार मिळाला पाहिजे, कष्टकरी महिलांना सन्मान मिळाला पाहिजे या साठी प्रयत्न करणार असून पुढील काळामध्ये कष्टकरी जनता महिला आघाडीच्या वतीने देशातील ४० कोटी असंघटित कामगार कष्टकऱ्यांसाठी सर्वांशी कायदा व्हावा यासाठी लढा देणार असल्याचे यावेळी अनिता सावळे यांनी सांगितले.
भीमा कोरेगाव संघर्ष सामाजिक समिती अध्यक्ष याबरोबरच इतर विविध आघाड्यांनमध्ये त्यांनी काम केले असून विविध पदावर त्यांनी काम केलेले आहे