शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सावतामाळी मंदिर , बनकर वस्ती येथे राष्ट्रवादी महिला संघटने तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.याचे आयोजन प्रा.सौ.कविता ताई आल्हाट यांनी केले होते
.या प्रसंगी मा. नगरसेवक.अरुण भाऊ बोऱ्हाडे , मा.नगरसेविका.सौ मंदाताई आल्हाट , शहर उपाध्यक्षा सौ.सपना ताई घाडगे , भोसरी कार्याध्यक्ष सौ .संगीताताई आहेर, सौ.उषाताई ठाकूर, सौ.राजश्रीताई बोऱ्हाडे,सौ.सरिताताई झिब्रे,सौ.सूनिताताई आल्हाट सौ.संगीताताई गुळवे,सौ.सुधा खोले,सौ अंकिता साबळे, ज्योती मधुलकर तसेच सावतामाळी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.दीलीपभाऊ बनकर, विश्वस्त #बाळासाहेब बोराटे, श्री.बाळासाहेब आल्हाट,श्री.अरविंदभाऊ बनकर .श्री. रविंद्र आल्हाट, सचिन आल्हाट इत्यादी उपस्थित होत
.या प्रसंगी श्री.अरूणभाऊ बोऱ्हाडे यांची ” पुणे जिल्हा वीज वितरण नियंत्रण समिती” या शासकीय समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा मंदिर ट्रस्ट तर्फे सन्मान करण्यात आला.