शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
आदित्य जनसेवा सप्ताह अंतर्गत युवासेना पिंपरी चिंचवड शहर व राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन वतीने चिंचवड विधानसभा प्रभाग क्रमांक 16 किवळे विकास नगर या भागात 9 जून 2021 रोजी ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला मास्क पी पी इ कीट हॅन्ड ग्लोज सॅनिटायझर त्याचप्रमाणे 10 जून 2021 रोजी श्रीनगर दत्तनगर बापदेव नगर एम बी कॅम्प या भागात 200 ब्लँकेट वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे 11 जून 2021रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी साफसफाई चे कर्मचारी व दत्तनगर या भागातील महिलांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
श्री मोरेश्वर तरस, गणेश जुनवणे ,श्रीकांत तरस ,गौरव तरस, राजेंद्र तरस, सुनीता चंदने पाटील सौ स्मिता राहुल तरस
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन,राजेंद्र तरस स्पोर्ट्स फाऊंडेशन, रणझुंजार महिला मंच विकासनगर किवळे यांनी केले आहे.