शबनम न्यूज / पिंपरी
महाराष्ट्र राज्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदार यांची नियुक्ती होणे अजून बाकी आहे आमदार नियुक्तीचा विषय हा लांबणीवर पडत आहे राजकीय द्वेषापोटी हा विषय ताणून धरला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी म्हटले आहे
सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत असतात महा विकास आघाडी सरकार वतीने 12 नावे या आमदारकीसाठी देण्यात आली आहे परंतु अद्यापही या आमदारांची नियुक्ती करण्यात आली नाही सतत काही ना काही कारणामुळे राज्यपाल नियुक्त आमदाराचा विषय हा लांबणीवर पडत आहे राज्यपालांनी लवकरात लवकर आमदारांची नियुक्ती करावी अशी मागणी विक्रम पवार यांनी केली आहे.
Advertisement