पुणे, दि. 12 : पुणे विभागातील 15 लाख 40 हजार 277 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 23 हजार 670 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 420 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 32 हजार 973 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.03 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 29 हजार 442 रुग्णांपैकी 9 लाख 98 हजार 215 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 13 हजार 926 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.97 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 78 हजार 945 रुग्णांपैकी 1 लाख 63 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 879 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 56 हजार 757 रुग्णांपैकी 1 लाख 49 हजार 468 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 60 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 28 हजार 379 रुग्णांपैकी 1 लाख 15 हजार 630 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 55 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 30 हजार 147 रुग्णांपैकी 1 लाख 13 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 500 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 255 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 367, सातारा जिल्ह्यात 713, सोलापूर जिल्ह्यात 379, सांगली जिल्ह्यात 941 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 855 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 6 हजार 241 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 852, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 365, सोलापूर जिल्हयामध्ये 666, सांगली जिल्हयामध्ये 992 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 366 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 29 लाख 88 हजार 969, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 82 हजार 940, सोलापूर जिल्हयामध्ये 6 लाख 18 हजार 740, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 36 हजार 63 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 417 नागरिकांचा समावेश आहे.